वित्त विभाग

विभाग प्रमुख

नाव (Name): श्रीम. सुनिता अरुण नाईक
पदनाम (Designation): सहा. लेखा अधिकारी (प्रभारी), लेखा विभाग
ई-मेल पत्ता (Email Address): bdo.vasai1@gmail.com
दूरध्वनी (Phone): 9833884594
पत्ता (Address): खोली क्रमांक 2, पंचायत समिती कार्यालय, वसई न्यायालयासमोर, वसईगांव, 401201.

विभागाविषयी

पंचायत समितीमधील ‘वित्त विभाग’ हा आर्थिक बाबी हाताळणारा मुख्य विभाग आहे. या विभागाचे प्रमुख सहायक लेखा अधिकारी असतात, जे गट विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली योजनांचे प्रस्ताव तपासणे, निधीचे व्यवस्थापन करणे आणि आर्थिक अहवाल तयार करणे अशी कामे करतात.

मुख्य कार्ये

आर्थिक प्रस्ताव तपासणे:
विविध विकास योजनांशी संबंधित आर्थिक व लेखाविषयक प्रस्तावांची छाननी करणे आणि अभिप्राय देणे.

अंदाजपत्रक तयार करणे:
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे स्वनिधीचे व शासकीय योजनांचे अंदाजपत्रक तयार करणे.

निधीचे व्यवस्थापन:
शासनाकडून मिळालेल्या अनुदानाचा वापर आणि झालेला खर्च यांचा ताळमेळ ठेवणे.

अहवाल तयार करणे:
आर्थिक व लेखाविषयक अहवाल तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करणे.

पदांचा तपशील :

अ.क्र. पदाचे नांव मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
1 सहाय्यक लेखा अधिकारी 1 0 1
2 कनिष्ठ लेखा अधिकारी 1 1 0
3 वरिष्ठ सहाय्यक (लेखा) 1 1 0
4 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 1 0 1
    4 2 2