परिचय
पंचायत समिती वसई गटाची स्थापना दि. 01.05.1962 रोजी झाली असुन तालुक्याचे एकुण क्षेत्रफळ 53,962 हेक्टर आहे. पूर्वीच्या अखंड ठाणे जिल्ह्यातील काही तालुके वेगळे करून दि. १ ऑगस्ट २०१४ ला ‘पालघर’ हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला. वसई तालुक्याचा समावेश पालघर जिल्ह्यात करण्यांत आला आहे. वसई गटात 49 महसुली गावे आहेत व 31 ग्रामपंचायती असुन सन 2011 च्या जनगणनेनुसार एकुण लोकसंख्या 108712 आहे. वसई पश्चिमेला अरबी समुद्राचा विलेाभनीय समुद्रकिनारा लाभलेला आहे. […]