मुलींना व महिलांना टायपिंग / टॅली / C+++ प्रशिक्षण देणे

.क्र. बाब तपशिल
1 योजनेचे नाव मुलींना व महिलांना टायपिंग / टॅली / C+++ प्रशिक्षण देणे
2 योजनेचे स्वरूप 1 एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 25 पर्यत कालावधीमध्ये टायपिंग / टॅली / C+++ उत्तीर्ण झालेल्या मुलींना उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर नियमानुसार प्रशिक्षणाचे शुल्क 10 टक्के लाभार्थी हिस्सा वजा करुन किंवा यथावकाश शासनाने बदल केलेली रक्कम / खरेदी समिती सभा मध्ये मंजुर रक्कम संबधित लाभार्थीचे बॅंक खात्यात तालुका स्तरावरुन वितरित करण्यात येईल.
3 योजनेचे उद्दिष्ट आदिवासी व ग्रामीण भागातील मुली व महिलांना टायपिंग / टॅली / C+++ प्रशिक्षण देवुन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणे.

त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे, महिलांना सक्षम करण्यासाठी हातभार लावणे.

4 योजनेचे लाभार्थी टायपिंग / टॅली / C+++ उत्तीर्ण झालेल्या मुली व महिला.
5 लाभाचे स्वरूप टायपिंग / टॅली / C+++ उत्तीर्ण झालेल्या मुली व महिला उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर नियमानुसार प्रशिक्षणाचे शुल्क 10 टक्के लाभार्थी हिस्सा वजा करुन किंवा यथावकाश शासनाने बदल केलेली रक्कम / खरेदी समिती सभा मध्ये मंजुर रक्कम संबधित लाभार्थीचे बॅंक खात्यात देणे.
6 पात्रतेचे निकष टायपिंग / टॅली / C+++ उत्तीर्ण झालेल्या मुली व महिला 1 एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 25 पर्यत कालावधीमध्ये टायपिंग / टॅली / C+++ उत्तीर्ण
7 आवश्यक कागदपत्रे परिपुर्ण भरर्लेला अर्ज, टायपिंग / टॅली / C+++ उत्तीर्ण  प्रमाणपत्र, आधारकार्ड, स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा.रेशन कार्ड), दारिद्रय रेषेचा नंबर व दाखला किंवा तहसिलदारचा उत्पनाचा दाखला, आदिवासी क्षेत्रात असल्यास ग्राम सभा ठरावाची प्रत्र, बॅक खाते पासबुकाची प्रत
8 कार्यान्वित यंत्रणा संपूर्ण पत्ता बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वसई, न्यायालयाच्या समोर, पंचायत समिती वसई पिन 401201
9 योजनेच्या अटी शर्ती टायपिंग / टॅली / C+++ उत्तीर्ण झालेल्या मुली व महिला

1 एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 24 पर्यत कालावधीमध्ये टायपिंग / टॅली / C+++ उत्तीर्ण

10 अर्ज करण्याची पद्धती अंगणवाडी सेविका मार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण भरलेला अर्ज सादर करणे, बाल विकास प्रकल्पाधिकारी यांचे मार्फत जिल्हास्तरावर एकत्रित सर्व अर्ज महिला बालकल्याण समिती मान्यतेसाठी सादर करणे