महिलांना साहित्य पुरविणे.

.क्र.बाबतपशिल
1योजनेचे नावमहिलांना साहित्य पुरविणे.
2योजनेचे स्वरूपमहिलांना साहित्य पुरविणे अंतर्गत पिठाची गिरणी, सौर कंदिल,शिलाई मशीन,पिको फॉल मशीन, पल्वराईझर, छोटे किराणा दुकान, हातगाडी – छप्परसह, झेरॉक्स मशिन इ. साहित्य  पुरविणे.
3योजनेचे उद्दिष्टआदिवासी व ग्रामीण भागातील महिलांना  स्वयंरोजगारासाठी मदत करणे. महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे व महिलांना सक्षम करण्यासाठी हातभार लावणे.
4योजनेचे लाभार्थीवय 18 ते 50 दरम्यानच्या महिला. लाभार्थी निवड करताना विधवा, निराधार, परितक्त्या यांना प्राधान्य
5लाभाचे स्वरूपपिठाची गिरणी, सौर कंदिल,शिलाई मशीन,पिको फॉल मशीन, पल्वराईझर, छोटे किराणा दुकान, हातगाडी – छप्परसह, झेरॉक्स मशिन इ. साहित्य घेणेसाठी 10 टक्के लाभार्थी हिस्सा वजा करुन खरेदी समिती सभा मध्ये मंजुर रक्कम संबधित लाभार्थीचे बॅंक खात्यात देणे
6पात्रतेचे निकषवय 18 ते 50 दरम्यानच्या महिला. लाभार्थी निवड करताना विधवा, निराधार, परितक्त्या यांना प्राधान्य.
7आवश्यक कागदपत्रेपरिपुर्ण भरर्लेला अर्ज, लाईट बिल, आधारकार्ड, स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा.रेशन कार्ड), दारिद्रय रेषेचा नंबर व दाखला किंवा तहसिलदारचा उत्पनाचा दाखला, आदिवासी क्षेत्रात असल्यास ग्राम सभा ठरावाची प्रत्र, बॅक खाते पासबुकाची प्रत.
8कार्यान्वित यंत्रणा संपूर्ण पत्ताबालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वसई, न्यायालयाच्या समोर, पंचायत समिती वसई पिन 401201
9योजनेच्या अटी शर्तीवय 18 ते 50 दरम्यानच्या महिला. लाभार्थी निवड करताना विधवा, निराधार, परितक्त्या यांना प्राधान्य.
10अर्ज करण्याची पद्धतीअंगणवाडी सेविका मार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण भरलेला अर्ज सादर करणे, बाल विकास प्रकल्पाधिकारी यांचे मार्फत जिल्हास्तरावर एकत्रित सर्व अर्ज महिला बालकल्याण समिती मान्यतेसाठी सादर करणे