सामान्य प्रशासन विभाग

विभाग प्रमुख

नाव (Name): श्री अशोक सोनार
पदनाम (Designation): सहाय्यक प्रशासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग
ई-मेल पत्ता (Email Address): bdo.vasai1@gmail.com
दूरध्वनी (Phone): 8600685600
पत्ता (Address): खोली क्रमांक 7, पंचायत समिती कार्यालय, वसई न्यायालयासमोर, वसईगांव, 401201.

विभागाविषयी

पंचायत समितीचा ‘सामान्य प्रशासन विभाग’ हा एक महत्त्वाचा विभाग असून तो पंचायत समितीच्या अंतर्गत प्रशासकीय कामकाज, कर्मचारी व्यवस्थापन ( पदोन्नती, बदल्या), गोपनीय अहवाल, खातेनिहाय चौकशी वित्तीय व्यवस्थापन आणि विकास योजनांची अंमलबजावणी पाहतो.

सामान्य प्रशासन विभागाची प्रमुख कामे

  • कर्मचारी व्यवस्थापन
  • प्रशासकीय कामकाज
  • वित्तीय आणि विकास योजना
  • देखरेख व नियंत्रण

कर्मचारी व्यवस्थापन

वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, बदल्या, निवृत्तीवेतन आणि खातेनिहाय चौकशी यांसारख्या कामांची जबाबदारी या विभागावर असते.

प्रशासकीय कामकाज

पंचायत समितीच्या बैठका बोलावणे, समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे या विभागाकडून केले जाते.

वित्तीय आणि विकास योजना

समितीच्या ठरावांची आणि निर्णयांची अंमलबजावणी करणे तसेच विविध विकास योजनांवर नियंत्रण ठेवणे हे या विभागाच्या कामाचा एक भाग आहे.

देखरेख व नियंत्रण

जिल्हा परिषद आणि शासनाच्या आदेशानुसार कामे पार पाडणे आणि पंचायत समितीच्या प्रशासकीय कार्यक्षमतेत सुधारणा करणे.

पदांचा तपशील :

अ.क्र.पदाचे नांवमंजूर पदेभरलेली पदेरिक्त पदे
1सहाय्यक प्रशासन अधिकारी110
2कनिष्ठ प्रशासन अधिकारी220
3विस्तार अधिकारी (सांख्यिकी)110
4वरिष्ठ सहाय्यक541
5कनिष्ठ सहाय्यक1174
6वाहन चालक110
7शिपाई844
  29209