भालिवली गावात यशश्री महिला शेतकरी कंपनीच्या ‘उमेद घरकुल मार्ट’ चे उद्घाटन

  • Start Date : 26/03/2025
  • End Date : 26/03/2025
  • Venue : Vasai

दि. 26/03/2025 रोजी वसई  तालुक्यातील ग्राम पंचायत खानिवडे येथील भालिवली गावात माऊली प्रभाग संघ अंतर्गत यशश्री महिला शेतकरी कंपनी यांच्या उमेद घरकुल मार्ट चा उद्‌घाटन समारंभ पार पडला. या प्रसंगी वसई तालुक्याचे मा. गटविकास अधिकारी श्री प्रदीप डोलारे, श्री ज्योतिर्मय पाटील विस्तार अधिकारी, तालुका व्यवस्थापक सुप्रिया लोके, खानिवडे ग्रामसेवक, सरपंच तसेच भाताणे प्रभागाचे कॅडर आणि यशश्री महिला शेतकरी कंपनी चे सर्व संचालक मंडळ तसेच घरकुल लाभार्थी  उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित लाभार्थी नी साहित्य खरेदी केली त्याचे वाटप करण्यात आले. आजच्या दिवसाची  4900/- विक्री होऊन सुरवात झाली.