परिचय

पंचायत समिती वसई सामान्य माहिती

पंचायत समिती वसई गटाची स्थापना दि. 01.05.1962 रोजी झाली असुन तालुक्याचे एकुण क्षेत्रफळ 53,962 हेक्टर आहे. पूर्वीच्या अखंड ठाणे जिल्ह्यातील काही तालुके वेगळे करून दि. १ ऑगस्ट २०१४ ला ‘पालघर’ हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला. वसई तालुक्याचा समावेश पालघर जिल्ह्यात करण्यांत आला आहे. वसई गटात 49 महसुली गावे आहेत व 31 ग्रामपंचायती असुन सन 2011 च्या जनगणनेनुसार एकुण लोकसंख्या 108712 आहे. वसई पश्चिमेला अरबी समुद्राचा विलेाभनीय समुद्रकिनारा लाभलेला आहे. वसईचा किल्ला हे येथील ऐतिहासिक पर्यटन स्थळ असून वसई पूर्वेस विरार येथे जिवदानी मातेचे जागृत देवस्थान आहे. अर्नाळा सागरी किल्ले मधील उत्तम किल्ला आहे. तो वसई तालुक्यातील, अर्नाळा गावात स्थित आहे. अर्नाळा किल्ला ‘जलदुर्ग ‘ किंवा ‘जंजिरे अर्नाळा’ असे देखील ओळखले जाते. अर्नाळा अशा मुघल, मराठे, पोर्तुगीज, आणि शेवटी पेशवे म्हणून अनेक साम्राज्याचा ताब्यात आलेली . सुलतान महमूद बेगदा मूलतः इ.स. १५१६ मध्ये हा किल्ला बांधण्यात आला . तेथे अन्न नाही पण पाणी गडावर चांगले उपलब्ध आहे. हा किल्ला आकारात आयताकृती आहे आणि जवळजवळ पाणी वेढला आहे. त्र्यंबकेश्वर, भवानी माता, कालिका माता आणि महादेव अशी अनेक मंदिरे आहेत. तीन प्रवेशद्वार आहे त्यापेकी एक प्रवेशद्वार दोन्ही बाजूंच्या मोठी बुरुज आहे जे किल्ल्याच्या उत्तर बाजूला आहे.

पंचायत समिती वसई सामान्य माहिती
विभाग माहिती
वसई तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 53,962 हेक्टर
वसई तालुक्यास लाभलेला समुद्र किनारा ३१.२ kms
एकुण लोकसंख्या ( २०११ जनगणना) 1,08,712
अ.ज. लोकसंख्या 39,690
जिल्हा परिषद गट 4
पंचायत समिती गण 8
ग्रामपंचायत 31
एकुण महसुल गावाची संख्या 49
पेसा ग्रामपंचायत 19
पशुवैदयकीय दवाखाने 9
प्राथमिक आरोग्य केंद्र 8
जिल्हा परिषद दवाखाना 1
आरोग्य पथक 1
उपकेंद्र 32
प्राथमिक शाळा 191
हवामान उष्ण व दमट
पर्जन्यमान सरासरी 2500 ते 3500 मि.मी.
नदी व खोरे तानसा, वैतरणा
तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळे
पर्यटण स्थळे अर्नाळा किल्ला, भुईकोट किल्ला वसई, तुंगारेश्वर अभयारण्य, कळंब बीच, अर्नाळा बीच, वसई सुरूची बाग
मंदीर/ देवस्थान जिवदानी माता मंदिर विरार, तुंगारेश्वर महादेव मंदिर
शेती विषयक प्रसिध्द बाबी वसई सुकेळी प्रसिध्द आहेत
गड किल्ले अर्नाळा किल्ला, वसई भुईकोट किल्ला

आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे.

बलवंतराय मेहता समितीने (१९५८) ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केलेली आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने दि. ०१ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्राम पंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राज ची स्थापना केली. अशा प्रकारे पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील नववे राज्य बनले. जिल्हा परिषद भारतातील जिल्हा स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था असूनू राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती व सेवा ग्रामीण भागातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पंचायत समिती मार्फत करते. पंचायत समिती ही जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीमधील महत्वाचा दूवा आहे.