आंतरजातीय विवाहितांना प्रोत्साहनपर अनुदान देणे

आंतरजातीय विवाहितांना प्रोत्साहनपर अनुदान देणे:- या योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजातील जातीय भेदभाव दूर करून एकात्मिकतेची भावना रुजविणे या करीता केंद्र शासन व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्याला राज्य शासन 25,000/- व केंद्र शासन- 25,000/- असे एकूण 50,000/- प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.

अर्ज कसा करावा:-

  1. विहित नुमना अर्ज
  2. विवाह नोंदणी दाखला
  3. वराचा शाळा सोडल्याचा दाखला (वर व वधुचे)
  4. वराचा जातीचा दाखला
  5. वधुचा जातीचा दाखला
  6. दोन प्रतिष्ठीत व्यक्तीचे शिफारस पत्र (वर व वधुचे)
  7. महाराष्ट्र रहिवासी दाखला (वर व वधुचे)
  8. सदर योजनेचा यापुर्वी लाभ घेतला नसल्याचे प्रतिज्ञापत्र 100 रु. स्टॅम्प पेपरवर.

 

विहित नमुन्यामध्ये तालुका स्तरावर ऑफलाईन अर्ज करावा. अधिक माहिती करीता जिल्हा स्तरावर – समाजकल्याण अधिकारी व तालुका स्तरावर – गट विकास अधिकारी/विस्तार अधिकारी (समाजकल्याण) यांच्याकडे संपर्क साधावा.