जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा विभाग (DRDA)

विभाग प्रमुख

नाव (Name): श्री ज्योतिर्मय पाटील
पदनाम (Designation): विस्तार अधिकारी (सांख्यिकी/घरकुल योजना), जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा विभाग
ई-मेल पत्ता (Email Address): bdo.vasai1@gmail.com
दूरध्वनी (Phone): 9561855949
पत्ता (Address): खोली क्रमांक 7, पंचायत समिती कार्यालय, वसई न्यायालयासमोर, वसईगांव, 401201.

विभागाविषयी

पंचायत समिती मधील घरकुल विभाग हा ग्रामिण भागातील बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करतो. हा विभाग प्रधानमंत्री आवास योजना (PMAY-G) शबरी आदिवासी घरकुल योजना, आदिम जमाती आवास योजना, रमाई आवास योजनेसारख्या विविध घरकुल योजना राबवतो, ज्यामध्ये लाभार्थ्यांची निवड करणे, अर्ज प्रक्रिया आणि घरकुल बांधकामाचे नियोजन करणे ही कामे समाविष्ट असतात.

घरकुल विभागाचे कार्य:

  • योजनांची अंमलबजावणी:

केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध घरकुल योजनांची अंमलबजावणी करणे. 

  • लाभार्थी निवड:

ग्रामीण भागातील बेघर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांतील पात्र लाभार्थ्यांची निवड करणे.