प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण
कालावधी प्रारंभ – 2016
कालावधी समाप्त – NA
क्षेत्र – २६९ चौ. फूट क्षेत्रफळ
अनुदान व फायदे :-
१. घरकुलास रक्कम रु. 1, 20, 000/- अनुदान निश्चित करण्यात आलेले आहे.
२. घरकुलास पहिला पहिला हप्ता अग्रीम रु. 15,000/-, दुसरा हप्ता रु. 70,000/-, तिसरा हप्ता रु. 30,000/-, चौथा हप्ता रू. 5000/- अनुदान PFMS प्रणालीव्दारे लाभार्थींच्या बँक खातेवर जमा करण्यात येते.
३. घरकुलासोबत शौचालयाचे बांधकाम करणे बंधनकारक आहे.
४. शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपयांची अतिरिक्त मदत आणि 90 दिवसांचा रोजगार (मनरेगा अंतर्गत) मिळू शकतो.
प्रधानमंत्री जनमन आवास योजना
कालावधी प्रारंभ – २०२३
कालावधी समाप्त – NA
क्षेत्र – २६९ चौ. फूट क्षेत्रफळ
अनुदान व फायदे :-
१. रक्कम रु. 2, 00, 000/- पैकी नवीन घरकुलाच्या बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते.
अनुदान हे PFMS प्रणालीव्दारे लाभार्थींच्या बँक खातेवर जमा करता येते.
२. घरकुलास पहिला पहिला हप्ता अग्रीम रु. 90,000/-, दुसरा हप्ता रु. 90,000/-, तिसरा हप्ता रु. 20,000/-
३. घरकुलासोबत शौचालयाचे बांधकाम करणे बंधनकारक आहे.
४. शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपयांची अतिरिक्त मदत आणि 90 दिवसांचा रोजगार (मनरेगा अंतर्गत) मिळू शकतो.