योजनेचे लाभार्थी निकषः शोलय पोषण आहार योजनेंतर्गत १ली ते ८वी च्या विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत शालेय पोषण आहार दिला जातो. सदर योजना केंद्र व राज्य शासनाच्या शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा, शासन मान्य अनुदानित शाळांना तसेच शासकीय व शासकीय अनुदानीत आश्रम शाळेतील अनिवासी विद्यार्थ्यांकरीता आहे.
योजनेची उद्दीष्टे :- प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे, शाळांमधील पट नोंदणी, उपस्थिती वाढविणे, विद्यार्थ्यांची दुपार नंतर होणारी गळती रोखणे, विद्यार्थ्यांचे अध्यायनाकडे लक्ष केंद्रीत करणे, धर्म, जात, लिंग भेदभाव नष्ट करणे,
योजनेचे स्वरूपः- वसई तालुक्यात जिल्हा परीषद 191 व खाजगी अनुदानित 100 शाळांमधील 54486 इतके विदयार्थी शालेय पोषण आहारचा लाभ घेतात. शाळांना शालेय पोषण आहार योजना राबविण्याकरिता इंधन भाजीपाला दर महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय क्रमांक : शापोआ-2024 /प्र.क्र.144 /एस डी 03/1093480 दिनांक 12 जुन 2025 अन्वये प्रति विदयार्थी प्रतिदिन इ.1 ली ते 5 वी साठी रु. 2.59 पैसे व इ.6 वी ते 8 वी साठी रु. 3.88 पैसे या प्रमाणे इंधनखर्च देण्यात येतो. पुरवठादारामार्फत तांदुळ व धान्यादी मालाचे वाटप शाळांना करण्यात येऊन अन्न शिजविणा-या यंत्रणेमार्फत लाभार्थी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो.