अनु. जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे:- राज्य शासनस्तरावरील सदर योजने अंतर्गत अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये रस्ते, लाईट, पाणी इ. सोयी सुविधा पुरविणे तसेच सदर वस्तीमध्ये समाजमंदीर बांधून दिले जाते.
योजनेकरीता आवश्यक कागदपत्रे:–
- ग्रामपंचायतीचा ठराव.
- प्रस्तावित कामाचे अंदाजपत्रक.
- कामाचा नकाशा.
- ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे नमुना नं.3/4
- विहित रक्कमेपेक्षा जादा निधी लागल्यास ग्रामपंचायत करण्यास तयार असल्याचा दाखला