मुलींना कन्यादान साहित्य वाटप करणे.

.क्र.बाबतपशिल
1योजनेचे नावमुलींना कन्यादान साहित्य वाटप करणे.
2योजनेचे स्वरूपदारीद्र रेषेखालील कुटूंब तसेच ज्या कुटूंबाची उत्पन्नाची मर्यादा रु.1,20,000/- पर्यत आहे अशा कुटूंबातील मुलींना कन्यादान साहित्य वाटपा करिता रु.10,000/- अनुदान DBT व्दारे मुलींच्या नावे बँक खात्यावर जमा करता येईल.
3योजनेचे उद्दिष्टबाल विवाह रोखण्यात मदत होईल. पर्यायाने कुपोषण, बालमृत्यू व माता मृत्यू टाळता येईल.
4योजनेचे लाभार्थीमुलाचे 21  व मुलीचे वय 18 होऊन लग्न झालेलेल्या मुली.
5लाभाचे स्वरूपरु.10,000/- अनुदान संबधित लाभार्थीचे बॅंक खात्यात देणे
6पात्रतेचे निकषया योजने अंतर्गत दारीद्र रेषेखालील कुटूंब तसेच ज्या कुटूंबाची उत्पन्नाची मर्यादा रु.1,20,000/- पर्यत आहे अशा कुटूंबातील मुलींना कन्यादान साहित्य वाटपा करिता रु.10,000/- अनुदान DBT व्दारे मुलींच्या नावे बँक खात्यावर जमा करता येईल.

मुलीचे लग्नाचे 18 व मुलाचे 21 

मुलीचे शिक्षण 10 वी उत्तीर्ण

मुलीचे लग्नाचा कालावधी एप्रिल 24 ते फेब्रुवारी 25 मध्ये झालेले असावे.

मुलगी वसई तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील असुन कन्यादान योजनेसाठी अर्ज सादर करताना ग्रामपंचायतची  शिफारस करणे आवश्यक राहील.

7आवश्यक कागदपत्रेपरिपुर्ण भरर्लेला अर्ज, लग्नाचे प्रमाणपत्र, सोबत सर्व कागदपत्र, आधारकार्ड, स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा.रेशन कार्ड), दारिद्रय रेषेचा नंबर व दाखला किंवा तहसिलदारचा उत्पनाचा दाखला, आदिवासी क्षेत्रात असल्यास ग्राम सभा ठरावाची प्रत्र, बॅक खाते पासबुकाची प्रत.
8कार्यान्वित यंत्रणा संपूर्ण पत्ताबालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वसई, न्यायालयाच्या समोर, पंचायत समिती वसई पिन 401201
9योजनेच्या अटी शर्तीमुलीचे लग्नाचे वय 18 वर्ष पूर्ण व मुलाचे 21 वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे.

मुलीचे शिक्षण 10 वी उत्तीर्ण

मुलीचे लग्नाचा कालावधी एप्रिल 23 ते फेब्रुवारी 24 मध्ये झालेले असावे.

मुलगी वसई तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील असुन कन्यादान योजनेसाठी अर्ज सादर करताना ग्रामपंचायतची  शिफारस करणे आवश्यक राहील.

10अर्ज करण्याची पद्धतीअंगणवाडी सेविका मार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण भरलेला अर्ज सादर करणे, बाल विकास प्रकल्पाधिकारी यांचे मार्फत जिल्हास्तरावर एकत्रित सर्व अर्ज महिला बालकल्याण समिती मान्यतेसाठी सादर करणे