शाळेत जाणा-या मुलींना दोन चाकी सायकल पुरविणे.

.क्र.बाबतपशिल
1योजनेचे नावशाळेत जाणा-या मुलींना दोन चाकी सायकल पुरविणे.
2योजनेचे स्वरूपग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थींनींच्या त्यांचे राहत्या घरापासुन शाळेपर्यतचे अंतर कमीत कमी 2 कि.मी.असणा-या मुलींना दोन चाकी सायकल योजनेचा लाभ दिला जाईल.
3योजनेचे उद्दिष्टशाळेत जाणा-या आर्थीकदृष्टया कमकुवत असलेल्या कुटूंबातील मुलींना वेळेवर शाळेत पोहोचता यावे, त्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळावा, शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे.
4योजनेचे लाभार्थीइ.5 वी ते 12 वी मध्ये शिकणा-या मुली.
5लाभाचे स्वरूपशाळेत जाणा-या मुलींना दोन चाकी सायकल घेणेसाठी 10 टक्के लाभार्थी हिस्सा वजा करुन खरेदी समिती सभा मध्ये मंजुर रक्कम संबधित लाभार्थीचे बॅंक खात्यात देणे.
6पात्रतेचे निकषग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थींनींच्या त्यांचे राहत्या घरापासुन शाळेपर्यतचे अंतर कमीत कमी 2 कि.मी.असणा-या मुलींना प्राधान्याने लाभ देण्यात येईल.

क्र.1 प्रमाणे लाभार्थी संपल्यानंतर 1 कि.मी. पेक्षा जास्त अंतरावरील विद्यार्थीनींना लाभ देण्यात येईल. इ.5 वी ते 12 वी मध्ये शिकणा-या मुली.

7आवश्यक कागदपत्रेपरिपुर्ण भरर्लेला अर्ज, आधारकार्ड, स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा.रेशन कार्ड), दारिद्रय रेषेचा नंबर व दाखला किंवा तहसिलदारचा उत्पनाचा दाखला, आदिवासी क्षेत्रात असल्यास ग्राम सभा ठरावाची प्रत्र, बॅक खाते पासबुकाची प्रत
8कार्यान्वित यंत्रणा संपूर्ण पत्ताबालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वसई, न्यायालयाच्या समोर, पंचायत समिती वसई पिन 401201
9योजनेच्या अटी शर्तीइ.5 वी ते 12 वी मध्ये शिकणा-या मुली
10अर्ज करण्याची पद्धतीअंगणवाडी सेविका मार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण भरलेला अर्ज सादर करणे, बाल विकास प्रकल्पाधिकारी यांचे मार्फत जिल्हास्तरावर एकत्रित सर्व अर्ज महिला बालकल्याण समिती मान्यतेसाठी सादर करणे