पाणी गुणवत्ता कार्यक्रम

योजनेचे स्वरूप योजनेचे निकष
1.जीवन मिशन कार्यक्रमाच्या प्रभावी मलबजावणीसाठी पाणी गुणवत्ता कार्यक्रम राबवुन ग्रामीण जनतेला प्रती दिन 55 लिटर शुध्द आणि शाश्वत पाणी देणे

2. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासून, ती सुधारून लोकांना सुरक्षित पाणी पुरवण्यासाठी आहे. यामध्ये वर्षातून दोनदा पाणी नमुने घेऊन तपासले जातात. ही योजना ग्रामीण भागातील कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवण्यासाठी सुरू केली आहे

1.पाणी गुणवत्ता सनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत,पाणी पुरवठा व स्वच्छता विभागा मार्फत आणि आरोग्य विभागाच्या मदतीने, पाणी गुणवत्तेची जबाबदारी प्रामुख्याने पार पाडण्यात येते. ग्रामीण पाणी पुरवठा आरोग्य विभागामध्ये पाणी गुणवत्ता साथरोग या संबंधी माहितीची देवाण घेवाण होण्यासाठी कार्यवाही करण्या येते.

2. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध असलेल्या FTK कीट चा वापर करुन प्रत्यक्ष स्त्रोतांच्या ठिकाणी जाऊन नमुन्यांची तपासणी करणे, ग्रामपंचायतीमध्ये ठेवण्यात आलेल्या TCL चा साठा, TCL साठवून ठेवण्याची पद्धत, तसेच त्याची नोंदवही व प्रत्यक्ष वापर होतो किंवा नाही त्याची तपासणी करणे, स्वच्छता सर्वेक्षणाच्या अभियानात स्त्रोत व स्त्रोतांच्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ करुन घेणे तसेच जवळपास राहणा-या कुटुंबाशी संवाद साधणे,लाल कार्ड व पिवळे कार्ड प्राप्त ग्रामपंचायतींची विशेष तपासणी करुन प्राप्त असणा-या पिवळ्या कार्डाचे हिरव्या कार्डात रुपांतर होण्यासाठी विशेष प्रयत्न करणे.