दिव्यांग महिलांना लघुउद्योगाकरिता साहित्य पुरविणे

.क्र.बाबतपशिल
1योजनेचे नावदिव्यांग महिलांना लघुउद्योगाकरिता साहित्य पुरविणे
2योजनेचे स्वरूपपिठाची गिरणी, सौर कंदिल,शिलाई मशीन,पिको फॉल मशीन, पल्वराईझर, छोटे किराणा दुकान, हातगाडी – छप्परसह, झेरॉक्स मशिन इ. साहित्य  पुरविणे.
3योजनेचे उद्दिष्टआदिवासी व ग्रामीण भागातील दिव्यांग महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत करणे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे व सक्षम करण्यासाठी हातभार लावणे.
4योजनेचे लाभार्थीवय 18 ते 50 दरम्यानचे दिव्यांग महिला
5लाभाचे स्वरूपपिठाची गिरणी, सौर कंदिल,शिलाई

मशीन,पिको फॉल मशीन, पल्वराईझर, छोटे किराणा दुकान, हातगाडी – छप्परसह, झेरॉक्स मशिन इ. घेणेसाठी 10 टक्के लाभार्थी हिस्सा वजा करुन खरेदी समिती सभा मध्ये मंजुर रक्कम संबधित लाभार्थीचे बॅंक खात्यात देणे

6पात्रतेचे निकषवय 18 ते 50 दरम्यानचे दिव्यांग महिला
7आवश्यक कागदपत्रेपरिपुर्ण भरर्लेला अर्ज, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कडील 40% अथवा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र, लाईट बिल, आधारकार्ड, स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा.रेशन कार्ड), दारिद्रय रेषेचा नंबर व दाखला किंवा तहसिलदारचा उत्पनाचा दाखला, आदिवासी क्षेत्रात असल्यास ग्राम सभा ठरावाची प्रत्र, बॅक खाते पासबुकाची प्रत.
8कार्यान्वित यंत्रणा संपूर्ण पत्ताबालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वसई, न्यायालयाच्या समोर, पंचायत समिती वसई पिन 401201
9योजनेच्या अटी शर्तीवय 18 ते 50 दरम्यानचे दिव्यांग महिला
10अर्ज करण्याची पद्धतीअंगणवाडी सेविका मार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण भरलेला अर्ज सादर करणे, बाल विकास प्रकल्पाधिकारी यांचे मार्फत जिल्हास्तरावर एकत्रित सर्व अर्ज महिला व बालकल्याण समिती मान्यतेसाठी सादर करणे