घनकचरा व सांडपाणी

योजनेचे स्वरूप योजनेचे निकष
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजनेचे स्वरूप म्हणजे कचरा निर्मिती कमी करणे, त्याचे वर्गीकरण करणे, पुनर्वापर करणे, आणि योग्य प्रक्रिया करून त्याची योग्य व सुरक्षित व्यवस्थापन करणे.घनकचरा व्यवस्थापनात कचरा कमी करणे (reduce), पुनर्वापर (reuse) आणि पुनर्निर्मिती (recycle) या ‘तीन आर’ तत्त्वांचा समावेश होतो. सांडपाणी व्यवस्थापनात घरगुती व सार्वजनिक सांडपाण्याची योग्य पद्धतीने साठवणूक, त्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध करणे आणि त्याची सुरक्षितपणे व्यवस्थापन करणे घनकचरा व सांडपाणी योजना प्रत्येक ग्रामपंचाततील गावामध्ये राबवण्यात येत आहे, कचऱ्याचे योग्य संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया आणि विल्हेवाट लावणे, तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांद्वारे पाणी शुद्ध करणे यावर आधारित आहेत. या योजनांचे मुख्य उद्दिष्टे आरोग्य सुधारणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, कचऱ्यातून ऊर्जा निर्माण करणे आणि रोजगार निर्मिती करणे ही आहेत.