Health Department

Department Head

Name: Dr. Antara Soni
Designation: तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग
Email Address vasaitho@yahoo.com
Phone 9987303838
Address Near Primary Health Center Navghar, Navghar Road, Vasai West, Pin 401202.

About the department

पंचायत समिती आरोग्य विभाग हा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील विभाग असून, तो पंचायत समिती स्तरावर आरोग्य सेवा पुरवण्याचे कार्य करतो. या विभागाचे प्रमुख तालुका आरोग्य अधिकारी असतात, त्यांच्या नियंत्रणाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमार्फत नागरिकांना आरोग्य सेवा दिल्या जातात.

आरोग्य विभागाचे कार्यक्षेत्र सागरी, नागरी, डोंगरी या विभागात विभागले असून तेथील नागरीकांचा मुख्यत्वे व्यवसाय मासेमारी, शेती व शेतीशी निगडीत भाजीपाला, फळबागा हा आहे. बराचसा भाग डोंगरी असल्याकरणाने सर्पदंश, विंचू दंश यांचे प्रमाण मोठया प्रमाणात आढळून येते.

आरोग्य सेवा पुरवणे:

नागरिकांना आवश्यक त्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, विशेषतः प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमार्फत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांची अंमलबजावणी:

कुटुंब कल्याण कार्यक्रम, राष्ट्रीय सिकल सेल निर्मूलन मिशन यांसारख्या विविध आरोग्य योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.

आरोग्य तपासणी आणि स्वच्छता:

सार्वजनिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी अन्न सेवा आस्थापना आणि इतर सार्वजनिक ठिकाणी आरोग्य मानकांची तपासणी करणे.

प्रशिक्षण आणि क्षमता विकास:

आरोग्य कर्मचारी आणि इतर संबंधित व्यक्तींना प्रशिक्षण देणे.

योजना आणि कार्यक्रम:

मानसिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय वृद्धत्व आरोग्य शुश्रुषा कार्यक्रम यांसारख्या विविध योजनांचे व्यवस्थापन करणे.

समन्वय आणि अहवाल:

जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाशी समन्वय साधणे आणि आवश्यक अहवाल सादर करणे.

संबंधित संस्था:

जिल्हा परिषद:

आरोग्य विभाग हा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत काम करतो, त्यामुळे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी या स्तरावर नेतृत्व करतात.

प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHCs) आणि उपकेंद्रे:

पंचायत समिती स्तरावर आरोग्य सेवा देण्यासाठी ही केंद्रे आणि उपकेंद्रे कार्यरत असतात.

समुदाय स्तरावर:

आशा कार्यकर्ते समुदाय स्तरावर आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

Details of the posts:

A.S. Job Title Approved positions Filled positions Vacancies
1 Taluka Health Officer 1 1 0
2 वैद्यकीय अधिकारी गट-अ 8 8 0
3 वैद्यकीय अधिकारी गट-ब 10 10 0
4 विस्तार अधिकारी (आरोग्य) 1 0 1
5 आरोग्य पर्यवेक्षक 1 1 0
6 औषध निर्माण अधिकारी 10 9 1
7 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 8 4 4
8 आरोग्य सहाय्यक (पुरुष) 10 8 2
9 आरोग्य सहाय्यक (महिला) 9 6 3
10 आरोग्य सेवक (पुरूष) 57 33 24
11 आरोग्य सेविका 51 31 20
12 Junior Assistant 9 7 2
13 Driver 10 0 10
14 Soldier 37 6 31
15 सफाई कामगार 10 0 10
    232 124 108